मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरील व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां...
मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरील व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेची डेडलाईन दिली आहे. पण आता महाराष्ट्र पोलिस राज ठाकरेंच्या विधानावर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली आहे. कायदेशीर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायदा सुव्यवस्थाबाबत आज (मंगळवार) माहिती दिली.
यावेळी गृहमंत्री वळसे आणि सीएम बैठकीत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली. राज्यात उद्या गुरुवारी दिवशी परराज्यातील लोक येऊन कायदा सुव्यवस्था मुद्दा बिघडू शकतात अशी शक्यता आहे, असे अहवाल गृह विभागाला मिळाला आहे. पोलिस विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना गृह मंत्रालय यांनी दिल्या आहे. राज्यातील कायदा सुव्यवथा नियंत्रण ठेवावी योग्य ते निर्णय घेत कठोर कायदेशीर कारवाई करा, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
COMMENTS