विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : शनिवार दिनांक 07 मे 2022 रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : शनिवार दिनांक 07 मे 2022 रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जुन्नर शहराची शिवाई देवी यात्रे साठी आलेल्या नागरिकांकडून जुन्नर शहरात झालेली अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांच्या प्रेरणेने करण्यात आले होते.
स्वच्छता अभियान प्रसंगी जुन्नर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. शामभाऊ पांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेस दोन वेळा स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे यामध्ये जुन्नरवासी यांचे तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे देखील खूप अभिमानाने सांगितले. त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन स्वतःची तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल देखील माहिती सांगितले या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिपेन्द्र उजगरे सर तसेच अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. हे स्वच्छता शिबीर राबवण्यासाठी प्रा. डॉ.राजाराम थोरवे तसेच प्रा. महेंद्र राजपूत व प्रा.मयूर चव्हाण व श्री कुमार सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले.या उपक्रमामुळे समाजासमोर स्वच्छतेचा एक नवा आदर्श तरुण पिढी साठी उभा राहिला आहे
COMMENTS