पुणे: शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असताना अनेक ठिकाणी जमिनीचे वाद विकोपाला गेले आहेत. शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी जमिनीमध्...
पुणे: शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असताना अनेक ठिकाणी जमिनीचे वाद विकोपाला गेले आहेत. शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी जमिनीमध्ये असलेल्या सामाईक विहिरीवरील पाण्यातून झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तब्बल एकवीस जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संतोष बाळासाहेब इंगवले व संदीप बापूसाहेब इंगवले यांच्या शेतजमिनीत सामाईक विहीर असून, दोघांच्या स्वतंत्र विद्युत पंप आहेत. विहिरीवर असलेल्या विद्युत पंपाच्या पाईप वरुन विहिरीवरच वाद झाला. दरम्यान, दोघांच्या भांडणाचा आवाज त्यांच्या घरी गेल्याने दोघांच्या घरातील महिला व पुरुष सदर विहिरीजवळ पळत आले. यानंतर दोन्ही गटात चांगलाच वाद होत वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही गटातील लोकांना एकमेकांना मारहाण केली.
याबाबत संतोष बाळासाहेब इंगवले व संदीप बापूसाहेब इंगवले (दोघे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. शिक्रापूर पोलिसांनी संदीप बापूसाहेब इंगवले, मालन संदीप इंगवले, राजेंद्र दिलीप इंगवले, दिलीप बापूसाहेब इंगवले, कमळाबाई बापूसाहेब इंगवले, कृष्णा राजेंद्र इंगवले, मनीषा राजेंद्र इंगवले, मयुरी राजेंद्र इंगवले, गणेश बाळासाहेब इंगवले, शिवाजी किसन इंगवले, पंकज उत्तम इंगवले, निलेश उत्तम इंगवले, संतोष बाळू इंगवले, बाळू किसन इंगवले, उत्तम किसन इंगवले, सोनी उर्फ प्रियांका निलेश इंगवले, पूजा पंकज इंगवले, लक्ष्मी बाळू इंगवले, शीतल संतोष इंगवले, संध्या गणेश इंगवले, अलका शिवाजी इंगवले (सर्व रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.
COMMENTS