नोएडा (उत्तर प्रदेश) : आई आणि दोन मुलींचे एकाचवेळी प्रेमसंबंध सुरू होते. तिघींनी पळून जाण्यासाठी कुटुंबियांना जेवणामधून विष दिले. सुदैवाने...
नोएडा (उत्तर प्रदेश) : आई आणि दोन मुलींचे एकाचवेळी प्रेमसंबंध सुरू होते. तिघींनी पळून जाण्यासाठी कुटुंबियांना जेवणामधून विष दिले. सुदैवाने विषाचा डोज कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांनी तिघींसह त्यांच्या प्रियकरांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि दोन मुलींचे प्रेमप्रकरण सुरू होते. कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांचे बाहेर जाणे बंद केले होते. त्या आपल्या प्रियकरांसोबत फोनवरही बोलू शकत नव्हत्या. यानंतर तिघींनी मिळून परिवाराच्या हत्येचा कट रचला. पण विष देताना मुलीचे काळीज पिघळलं. तिने जेवणात कमी विष टाकले. मुलीला वाटत होते की, घरातील सदस्यांचा जीव जाऊ नये. विषामुळे महिलेच्या सासूची स्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर घरातील इतर सदस्य उपचारानंतर घरी परत आले आहेत.
महिलेचे गावातच राहणाऱ्या एका तरूणासोबत अनैतिक संबंध होत. कुटुंबियांना समजल्यानंतर घरात नेहमीच वाद होत होता. त्यानंतर महिला घर सोडून गेली होती. बऱ्याच दिवसांनी ती परत आली. यादरम्यान तिच्या दोन मुलींचे गावातील दोन तरूणांसोबत प्रेमप्रकरण सुरू झाले होते. महिलेला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने विरोध केला नाही. यादरम्यान महिलाही तिच्या प्रियकरासोबत बोलत होती. कुटुंबियांच्या विरोधामुळे तिघींनी मिळून कट रचला होता. मुलींचे प्रियकर अभिषेक व दीपकने मुख्य भूमिका निभावली. सर्वांनी मिळून योजना आखली की, परिवाराला विष देऊ त्यांना संपवायचे. पळून जायचे आणि काही दिवसांनी पुन्हा परत यायचे. जेवणात विष टाकून सर्वांना देण्याची जबाबदारी मुलगी अर्चनाची होती. पण जेवणात विष टाकताना मुलीचे काळीज पिघळले. तिने कमी विष घातले. जेवणानंतर रात्री ११ वाजता सर्वांची स्थिती बिघडली आणि सगळे बेशुद्ध झाले.
यानंतर महिला तिच्या मुलींच्या प्रियकरांसोबत फरार झाली. घरात काहीच हालचाल झाली नाही तर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर धक्का बसला. सगळे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
COMMENTS