नाशिक : युपीआय व क्यूआर कोडच्या माध्यमातून पन्नास हजार रूपयांला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात ...
नाशिक : युपीआय व क्यूआर कोडच्या माध्यमातून पन्नास हजार रूपयांला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश काठे (रा. जानोरी ता.दिंडोरी ) या युवा शेतकऱयाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काठे यांचा फुलांचा व्यवसाय आहे. ऑनलाईन फुलांच्या ऑर्डर देवून भामट्यांनी व्यावसायीकाची फसवणूक केली आहे.
काठे यांच्या फुलांची परदेशात विक्री होत असल्याने अनेक ऑर्डर त्यांना ऑनलाईन पध्दतीने येतात. देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या कार्यक्रमासाठी ९१४४०३६५०३ व ८३७०८६७८०८ या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. फुलांच्या मागणी बरोबरच पैसे पाठविण्यासाठी भामट्यांनी त्यांच्या बँकची गोपनिय माहिती मिळविली. युपीआय व क्यूआर कोडची माहिती मिळवित अज्ञात संशयितांनी त्यांच्या बँक खात्यातील ४५ हजार ९९७ रूपये परस्पर काढून घेतले. यानंतर काठे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.
COMMENTS