सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आधुनिक आवर्तसारणीतील 118 मूलद्रव्यांपैकी 33 मूलद्रव्यांची माहिती कविता रूपाने "कविता मुलद्रव्याच...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आधुनिक आवर्तसारणीतील 118 मूलद्रव्यांपैकी 33 मूलद्रव्यांची माहिती कविता रूपाने "कविता मुलद्रव्याची "यात मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतीलाल बाबेल यांनी केला असून याला सात सन्मान प्राप्त झाले आहेत.
जॅकी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, हावर्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कविता मूलद्रव्याची नोंद झाली आहे.
मराठी साहित्य मंडळ,म.राज्य यांचे वतीने सातारा येथे राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे.
गेली तीस वर्ष प्रा. रतीलाल बाबेल हे विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन करीत असून मूलद्रव्यांची माहिती मुलांना, शिक्षकांना सहज सोप्या पद्धतीने ध्यानात राहण्यासाठी त्यांनी हा केलेला पहिलाच प्रयत्न. काव्यसंग्रहाचे कौतुक संसदरत्न खासदार डॉ .अमोल कोल्हे ,जी.एम. आर. टी चे केंद्रसंचालक प्राध्यापक यशवंत गुप्ता, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वे ,डॉक्टर निवास पाटील, डॉक्टर जे के सोळंकी यांनी केले असून महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक व समाजातील इतर घटकांनी हा काव्यसंग्रह खूपच बोलका असल्याचे सांगितले आहे. समाजातील घटकांचा विचार करता हा काव्यसंग्रह लवकरच हिंदी व इंग्रजी मध्ये रूपांतरित करण्याचा मानस असल्याचे मत प्रा.रतिलाल बाबेल यांनी मांडले. विज्ञान विषय सोपा होण्यासाठी विज्ञान कथा जशा उपयुक्त आहे तशाच विज्ञान कविता सुद्धा उपयुक्त होत असल्याचे मत रतीलाल बाबेल यांनी विविध सत्कार समारंभाच्या वेळी नमूद केले. या यशाबद्दल सातारा जिल्ह्यातील जळगाव येथील सर्व ग्रामस्थांनी बाबेल यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कवितांमधून पर्यावरणाचे रक्षण, दुर्गसंवर्धन, शेतकरी व सैनिकांचा आदर, पांढऱ्या पदार्थांचा कमी वापर यासारख्या अनेक नैतिकमूल्यांना स्थान देण्यात आले आहे .केवळ विज्ञान विषय न शिकता आपली सामाजिक जबाबदारी काय याची जाणीव होण्यासाठी हा एक कौतुकास्पद वेगळा प्रयोग रतिलाल बाबेल यांनी केला आहे.
COMMENTS