नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवरील उमरगाव फाट्या जवळ ट्रक आणि तवेरा मोटारीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे...
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवरील उमरगाव फाट्या जवळ ट्रक आणि तवेरा मोटारीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.
अपघात एवढा भीषण होता की चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ ही दुर्घटना घडली. शुक्रवारी (ता. ६) रात्री 11 वाजताच्या सुमारास तवेरा मोटार ही नागपूरच्या दिशेने येत होती. ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यावेळी मोटारीमध्ये दहा प्रवासी होते. त्यापैकी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तीन प्रवासी जखमी झाले त्यामध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे.
सागर शेंडे (रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (तवेराचालक), मेघा आशिष भुजाडे (रा. नझूल ले-आउट बेझनबाग), देविदास गेडाम, नरेश डोंगरे (रा. भीमचौक), इंदोरा अशी मृतांची नावे आहेत. उर्वरित मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS