विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख तसेच विज्ञान विभागप्रम...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख तसेच विज्ञान विभागप्रमुख व अभ्यासू व्यक्तिमत्व' विद्यार्थी प्रिय प्राध्यापक तसेच बस्ती ( सावरगाव ) चे लाडके सुपुत्र डॉ. उत्तम बाबुराव शेलार सर यांची श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या" प्रभारी प्राचार्यपदी "नियुक्ती दि. १७ मे २०२२ पासून करण्यात आलेली असून जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजयराव शिवाजीराव काळे साहेब यांनी प्राचार्य डॉ शेलार सरांचे हार्दिक अभिनंदन केले.
तसेच संस्थेचे सहसचिव श्री सुभाषराव कवडे साहेब' व माननीय अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक व्ही. बी. कुलकर्णी यांनी ही प्राचार्य डॉ शेलार सरांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ शेलार सरांचे मूळगाव बस्ती (सावरगाव ) असून सरांनी गेली 35 वर्ष या महाविद्यालयात अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच अनेक उज्वल पिढया घडविण्याचे कार्य सरांनी केलेले असून' विद्यार्थी प्रिय प्राध्यापक 'म्हणून सरांची एक वेगळी ओळख आहे. प्राचार्य डॉ शेलार सरांच्या नियुक्ती बद्दल 'प्राध्यापक' विद्यार्थी' पालक व सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.
COMMENTS