सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) तेजपर्व फाउंडेशनच्या वतीने दि.११ ते १२ मे,२०२२ रोजी आशिया खंडातील नंबर दोनची सर्वात मोठी सांदण व्हॅली...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
तेजपर्व फाउंडेशनच्या वतीने दि.११ ते १२ मे,२०२२ रोजी आशिया खंडातील नंबर दोनची सर्वात मोठी सांदण व्हॅली,जि. नगर येथे सुरक्षेच्या नियमांचे पालन करून रेज्युव्हिनेशन कॅम्प (नवचैतन्य शिबिराचे )आयोजन करण्यात आले अशी माहिती अध्यक्ष अमोल कापसे यांनी दिली.
मानसिक सामर्थ्याचे महत्व पटवून देऊन आई वडिलांप्रती आदरभाव वृद्धिंगत करणे व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
कॅम्पमध्ये ४ ते ५८ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला. एकूण ७०जण पुणे, चाकण, खेड, मुंबई,
नाशिक, सातारा, आळेफाटा, जुन्नर इ. ठिकाणांहून आलेले होते.
कॅम्पमध्ये भावनिक सामर्थ्यासाठी क्लिंझींग मेडिटेशन, स्वप्नपूर्तीसाठी सन मेडिटेशन ,शारीरिक व बौद्धिक क्षमतेसाठी नाविन्यपूर्ण खेळ, साहस वृद्धीसाठी ट्रेकिंग व रॅपलिंग आणि मनोरंजनासाठी डान्स,पारंपरिक आदिवासी तांबड नृत्य,सांघिक खेळ इ.चे आयोजन करण्यात आले. झुंबा डान्सचे प्रशिक्षण कांती प्रजापती व श्वेता पांडे यांनी,रॅपलिंगचे प्रशिक्षण संदेश दप्तरे व सहकारी यांनी तर लाठीकाठी चे सादरीकरण शिवकन्या भडांगे व जान्हवी कापसे यांनी केले.
विविध उपक्रमांमधून तणावमुक्त आनंदी जीवन कसे असते हे सर्वांनी अनुभवले.जीवनामध्ये मोबाईलपेक्षा अन्न,सूर्यप्रकाश,पाणी आणि हवा किती महत्वाचे आहेत याची जाणीव सर्वांना झाली.शिबिरातील विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंचे वाटप दुर्गम साम्रद गावातील लहान मुलांना केले.
सदर कॅम्पचे नियोजन संस्थापक श्री. अमोल कापसे यांनी केले.विदयार्थ्यांचे स्वागत शिवाजी गोरे सर, हर्षल मुथा व रेश्मा कापसे मॅडम यांनी तर कार्यवाही मिनल सांडभोर मॅडम,सचिन बाम्हणे सर,मयूर मिरे सर,सतीश सहिंद्रे सर यांनी केली.शिबिरासाठी विशेष सहकार्य राहुल कराळे,ऋषी पोळ,गणेश आवटे, आदित्य वामन,साहिल डोंगरे,विकी आल्हाट आणि सोमनाथ शिंगाडे सर यांनी केले.
COMMENTS