पुणे : सुनेवर सासर्याने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. याबाबत सासऱयावर गुन्हा दाखल केला असून, याबाबत पोलिस प...
पुणे : सुनेवर सासर्याने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. याबाबत सासऱयावर गुन्हा दाखल केला असून, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
यवतमाळ येथील एका २२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहकारनगर पोलिसांनी तळजाई पठार येथे राहणार्या एका ४७ वर्षाच्या सासर्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लग्न झाल्यापासून आरोपी सासरा हा फिर्यादीस मुलीसारखे प्रेम करीत असल्याचे भासवत होता. फिर्यादी यांची सासू कर्नाटकात गावी गेली होती. फिर्यादीचा पती घरी नसताना सासरा हळूच फिर्यादीच्या बेडरुममध्ये आला. त्याने फिर्यादीस बिलगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला दूर लोटले. तेव्हा त्याने 'तुझे मेरे लिए ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा,' असे म्हणून फिर्यादींना बेडवर पाडले. त्याला फिर्यादीने विरोध केल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडित महिलेने बदनामीच्या भितीने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. फिर्यादी हे कोणाला सांगत नाही, याचा गैरफायदा घेऊन सासर्याने तिच्यावर ३ वेळा बलात्कार केला. फिर्यादी महिला माहेरी निघून गेल्यानंतर तेथे त्यांनी फिर्याद दिली होती. ती सहकारनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS