आरोग्य टिप्स - ताज्या दह्यापासून बनवलेल्या ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये अ , ब , क , ई आणि के जीवनसत्त्वे असतात. सक...
आरोग्य
टिप्स - ताज्या दह्यापासून बनवलेल्या ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते.
ताकामध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्वे
असतात. सकाळी किंवा दुपारी ताक पिणे फायदेशीर ठरते. शक्यतो रात्रीच्या वेळी ताकाचे
सेवन करू नये. जाणून घ्या उन्हळ्यात ताक पिण्याचे फायदे
1.शरीराचे तापमान नियंत्रित
राहते
उन्हाळ्यात
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक प्यावे. ताक पिल्याने शरीराला त्वरीत
थंडावा मिळतो.
2.पचनक्रिया सुरळीत होते
नियमित
ताक पिल्याने पचनक्रिया चांगली राहते .पोटाच्या समस्याही कमी होतात.
3.ऍसिडिटी कमी होते
एक
ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून सेवन केल्याने ऍसिडिटी कमी
होते.
4.हाडे मजबूत होतात
ताकामध्ये
मोठ्या पमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
5.डिहाड्रेशनपासून बचाव होतो
ताकामध्ये
पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची
पातळी नियंत्रित राहते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा
डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो.
6.शरीरातील पाण्याची कमतरता
भरून निघते
उन्हाळ्यात
भरपूर घाम येतो. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात
ताक प्यावे. ताक पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
7.त्वचेचे आरोग्य सुधारते
ताक
पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील
सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.
8.वजन कमी होते
ताकामध्ये
कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे
राहते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
9.दात आणि हाडे मजबूत होतात
ताकात
भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत
कॅल्शिअमची गरज असते. नियमित ताकाचे सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
10.कोलेस्ट्रॉलची पातळी
नियंत्रणात राहते
नियमित
ताक पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका कमी होतो.
COMMENTS