आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात 'या' घरगुती पेयांच्या सेवनाने थकवा होईल तात्काळ दूर आणि शरीरालाही मिळेल थंडावा. | CrimeNama
Loading ...

आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात 'या' घरगुती पेयांच्या सेवनाने थकवा होईल तात्काळ दूर आणि शरीरालाही मिळेल थंडावा.

  आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात जास्त घामामुळे शरीरात पाणी जलद गतीने कमी होते. त्यामुळे लगेच थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड रा...

 


आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात जास्त घामामुळे शरीरात पाणी जलद गतीने कमी होते. त्यामुळे लगेच थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी केवळ थंड पाणी पिणे परिणामकारक नाही तर, काही घरगुती उन्हाळी पेयही (summer drinks) घेतली पाहिजेत.

त्यामुळे थकवा जाणून शरीराला एनर्जी मिळते. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणती घरगुती पेय शरीराला हायड्रेटेड ठेवतात, थकवा घालवतात आणि शरीराला थंडावाही देतात.

१.जलजीरा

जलजीरा हा जीरा आणि पाणी वापरून बनवला जातो. विशेषत: उन्हाळ्यात पचनाची समस्या असलेल्या लोकांनी जलजिऱ्याचे सेवन अवश्य करावे.

२.चिंच सरबत

चवीला आंबट गोड असणाऱ्या चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात चिंच आणि चिंचेचे सरबत यांचा अवश्य आहारात समावेश करावा.

३.द्राक्षांच सरबत

उन्हाळ्यात द्राक्ष खाल्याने शरीराला चांगला थंडावा मिळतो. द्राक्षे तुमच्या शरीरातील प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन यांचे प्रमाण भरपूर वाढवून तुम्हाला उन्हाळ्यात आजारांपासून दूर ठेवू शकतात. द्राक्षांप्रमाणेच द्राक्षांच सरबत देखील आरोग्यास उपयुक्त आहे.

४.कैरीचे पन्हे

कच्ची कैरी वापरून बनविले जाणारे कैरीचे पन्हे चवीसोबतच आरोग्यालाही चांगले आहे. कैरीचे पन्हे पिल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.

५.गाजर ज्यूस

गाजरामध्ये पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे शरीराला थंडावा देण्याबरोबरच गाजर ज्यूस पिल्याने अनेक आजरांपासून संरक्षण देखील होते.

६.कलिंगडाचे सरबत

कलिंगडामध्ये अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह अनेक पोषक घटक आढळतात.तसेच कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कलिंगडाचे सरबत पिल्याने तात्काळ ताजेतवाने वाटते.

७.लिंबू सरबत

उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत पाणी आवर्जून प्यावे. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी चे प्रमान भरपूर असते, जे थकलेल्या शरीराला रिफ्रेश करते. तसेच लिंबू पाण्यामुळे इम्युनिटीही वाढते. मात्र लिंबू सरबत पाण्यात बर्फाचा कमी वापर केला पाहिजे.अन्यथा सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो.

८.उसाचा रस

उसाच्या रसात असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि फोटोप्रोटेक्टिव्ह तत्व शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात वायरल इन्फेकशनपासून आपले रक्षण होते आणि आजार दूर राहतात.

उन्हाळ्यात अनेकांना डिहाइड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचण येते. अशावेळी उसाच्या रसाचे सेवन केल्यास डिहाइड्रेशनचा त्रास दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस अवश्य प्यावा.

९.नारळपाणी

नारळपाणी शरीराला ऊर्जा पुरवते. दररोज नारळपाणी पिल्याने डी हायड्रेशनचा त्रासही कमी होतो. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळपाणी देखील प्यावे.

१०.संत्री ज्यूस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या फळांच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते. संत्री ज्यूस पिल्याने थकवा लवकर दूर होतो.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,54,Amaravati,11,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2455,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,585,Dhule,8,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,420,India,236,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,10,Lifestyle,206,Maharashtra,977,Mumbai,241,Nagpur,21,Nashik,28,Politics,334,Pune,1455,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,16,Satara,24,Sindhudurg,3,Solapur,14,Sport,57,Technology,29,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात 'या' घरगुती पेयांच्या सेवनाने थकवा होईल तात्काळ दूर आणि शरीरालाही मिळेल थंडावा.
आरोग्य टिप्स : उन्हाळ्यात 'या' घरगुती पेयांच्या सेवनाने थकवा होईल तात्काळ दूर आणि शरीरालाही मिळेल थंडावा.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjrYlNeUvnmJFBzXZs4TW_D-4zY9V4z5U4weSKgjt0vyuit-g0S0AqUMYzVZdd6T8kfE27o3h17ogZSnmUrTWOIPCAMuubiFc2vyjbVPMuSVwdMEp0FGxtKoLLH_q30XZcAZalReRUrJIWiDzdh0FpMnm_gwbUGhv9yirOIx6baV2Pi3ApJ3_z4pkKP/s320/n38403562475d6ff43b1e3f2ba57def87ed788081e7cf981e860bcaa163e3f4d34b77aa57a.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjrYlNeUvnmJFBzXZs4TW_D-4zY9V4z5U4weSKgjt0vyuit-g0S0AqUMYzVZdd6T8kfE27o3h17ogZSnmUrTWOIPCAMuubiFc2vyjbVPMuSVwdMEp0FGxtKoLLH_q30XZcAZalReRUrJIWiDzdh0FpMnm_gwbUGhv9yirOIx6baV2Pi3ApJ3_z4pkKP/s72-c/n38403562475d6ff43b1e3f2ba57def87ed788081e7cf981e860bcaa163e3f4d34b77aa57a.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/05/blog-post_07.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/05/blog-post_07.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content