सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : डिसेंट फाउंडेशन व झेप फाउंडेशनचा आदिवासी भागातील स्तुत्य उपक्रम.. घाटघर ( ता. जुन्...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : डिसेंट फाउंडेशन व झेप फाउंडेशनचा आदिवासी भागातील स्तुत्य उपक्रम..
घाटघर ( ता. जुन्नर ) या अति दुर्गम व आदिवासी भागातील फांगुळगव्हाण वस्तीत डिसेंट फाउंडेशन व पुण्यातील झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुली व माता पालकांसाठी विशेष शारीरिक व मानसिक मार्गदर्शन व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात हिमोग्लोबिन व रक्त पेशींची तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट, लिवर फंक्शन टेस्ट, थायरॉईड फंक्शन टेस्ट व हृदय तपासणी या तपासण्या जवळपास साठ मुली व माता पालकांच्या मोफत करण्यात आल्या.
या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव चे प्रयोगशाळा वैज्ञानिक दिलीप कचरे , जुन्नर तालुका प्रयोग शाळा अधिकारी मंगेश साळवे व महालॅब प्रयोगशाळा तंत्रज्ञ नम्रता साळवे यांनी तपासण्या केल्या.
त्याच बरोबर शारीरिक मार्गदर्शनात वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य या बाबत डॉक्टर कल्याणी पुंडे तर आहार व व्यायाम याबाबत आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या गृहपाल अर्चना पवार यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई , झेप फाऊंडेशन च्या संचालिका रेश्मा सांबरे, प्रकल्प समन्वयक फकीर आतार, ग्रामसेवक संदीप मते, उपसरपंच बुधा काळे, पोलीस पाटील जया लांडे, संचालक सोमा मुळे, अशा सेविका सुनीता मुळे, अंगणवाडी सेविका पुष्पा कोरडे, माजी उपसरपंच पांडुरंग मुळे, काशिनाथ मुळे, किसन लांडे, अशोक मुळे, प्राथमिक शिक्षिका उर्मिला काफरे, राजाराम बोराडे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डिसेंट फाउंडेशन च्या वतीने उपस्थित मुली व महिलांना "कळी उमलताना" ही मार्गदर्शक पुस्तिका व सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत घाटघर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
COMMENTS