पुणेः पुणे जिल्ह्यामध्ये जमिनीला सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेक ठिकाणी भाऊ भावाचा वैरी झाल्याच्या घटना घडत आहेत. सणसवाडी येथे लग्नाला आल...
पुणेः पुणे जिल्ह्यामध्ये जमिनीला सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेक ठिकाणी भाऊ भावाचा वैरी झाल्याच्या घटना घडत आहेत. सणसवाडी येथे लग्नाला आलेल्या एका युवकाला जमिनीचा वाद सुरु असलेल्या भावासोबत राहतो म्हणून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तब्बल नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय येथे अमित झुरुंगे हे त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकंच्या लग्नासाठी आले होते. लग्नाहून परत जाण्यासाठी निघाले असताना एम एच १२ टी एस ९०५५, एम एच १२ एम एफ ९०५५, एम एच १२ टी वाय ९०५५ या तीन कार मधून नऊ जण हातामध्ये लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी अमित झुरुंगे यांना शिवीगाळ दमदाटी करत शंकर रामचंद्र भूमकर व आमच्यात जमिनीचा वाद आहे तू त्यांच्या सोबत का राहतो? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत अमित झुरुंगे त्यांचे चुलते संतोष झुरुंगे व चुलती अश्विनी झुरुंगे यांना बेकायदेशीर गर्दी जमवून हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.
याबाबत अमित कचरू झुरुंगे (वय ३३ वर्षे रा. पाटील वस्ती लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी मारुती रामचंद्र भूमकर, अथर्व मारुती भूमकर, शैलेजा मारुती भूमकर तिघे (रा. कल्याणी नगर तेलेरा पार्क पुणे), पांडुरंग दत्तात्रय भूमकर, स्वप्नील दत्तात्रय भूमकर, दत्तात्रय रामचंद्र भूमकर, श्रेयस पांडुरंग भूमकर, स्वाती पांडुरंग भूमकर, मृणाल स्वप्नील भूमकर (सर्व रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत.
COMMENTS