नागपूर: 'तू खूप गोड आहेस, तू वेगळी दिसतेस, बोलून जवळ यायचा आणि विद्यार्थिनीला सांगायचा की तू पास होण्यासाठी काय करू शकतेस', असे म्...
नागपूर: 'तू खूप गोड आहेस, तू वेगळी दिसतेस, बोलून जवळ यायचा आणि विद्यार्थिनीला सांगायचा की तू पास होण्यासाठी काय करू शकतेस', असे म्हणून एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
या प्रकरणी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीला परीक्षेत पास करण्याचे नाटक करुन प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पीडितीच्या तक्रारीवरुन आरोपी प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश गेडाम असे प्राध्यापकाचे नाव असून तो सिंधू महाविद्यालयाचा प्राध्यापक आहे.
कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीला प्रवेश मिळत नसल्याने तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरुन विद्यार्थिनीने एक वर्षापूर्वी प्राध्यापक राकेश गेडाम यांची भेट घेतली होती. त्याने विद्यार्थिनीला गेडा येथे प्रवेशासाठी मदत केली होती. त्यानंतरही तो तिला मदत करत राहिला. पण प्रत्येक वेळी गेडाम विद्यार्थिनीला हात लावायचा, अशी माहिती पीडित मुलीने दिली. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापकाचा हा प्रकार वाढला होता, त्या गोष्टीला कंटाळून युवतीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला असून, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS