पुणेः एका वर्षानंतर घरफोडी चोरीतील अट्टलचोराला जेरबंद करण्यात युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहरला यश आले आहे. पाच लाख तीनशे रुपये किंमतीचे १०२ ...
पुणेः एका वर्षानंतर घरफोडी चोरीतील अट्टलचोराला जेरबंद करण्यात युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहरला यश आले आहे. पाच लाख तीनशे रुपये किंमतीचे १०२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
१०/०३/२०२१ रोजी दुपारी ०३/३० ते दिनांक १५/०३/२०२१ रोजी सकाळी ०७/२५ वा चे दरम्यान प्रदीप स्वामी (रा.कात्रज पुणे) यांचे आणि त्यांचे शेजारील ओम सोसायटी मध्ये राहणारे सतीश करंदीकर यांचे घर बंद असताना चोरटयाने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दोन्ही घरातील दोन लाख नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्या व चांदीचे दागिने चोरुन नेले होते. त्याबाबत भारती विदयापीठ पोलिस स्टेशन पुणे गुरनं १५८/२०२१ भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
युनिट २ गुन्हे शाखा पुणे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदार पोलिस अभिलेखावरील घरफोडी चो-या करणारे गुन्हेगार चेक करत असताना खब-याकडुन माहिती मिळाली की, सुमारे एका वर्षापुर्वी झालेली वरील घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिस अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार जयवंत उर्फे जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३४, रा. आंबेडकर वसाहत डी.पी.रोड औंध पुणे) यानेच केलेला आहे. खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. तो सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,कोर्ट नंबर ४ शिवाजी नगर, पुणे यांचे आदेशावरुन त्यास मध्यवर्ती कारागृह, येरवडा, पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेऊन त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे बारकाईने तपास केला प्रथम त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली.
सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने पुणे शहरात व भुगाव भागात घरफोडी चोन्या केल्याची व त्यामधील सोन्याचे व चांदीचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी पुणे शहर, देहु रोड, श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर, सोलापुर या भागात त्याचेसह जावून तपास केला आहे. त्याचेकडुन वरील गुन्हयातील चोरीच्या दागिण्यासह इतर गुन्हयातील सोन्याचे दागिने वजन १०२ ग्रॅम किंमत रुपये पाच लाख पाच हजार सातशे चे जप्त करण्यात आले आहेत. त्याचेकडुन भारती विद्यापिठ पोलिस स्टेशन, सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर व पौड पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण कडील प्रत्येकी एक असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे. सदर आरोपी हा पोलिस अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारा सराईत व अट्टल गुन्हेगार आहे. त्याचेविरुध्द यापुर्वी पुणे शहर पोलिस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालयचे अभिलेखावर १०४ पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठी दिली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा, युनिट २. पुणे शहर, पोलिस उप-निरीक्षक, संजय गायकवाड, सहायक पोलिस फौजदार यशवंत आंब्रे,अस्लम पठाण, पोलिस अंमलदार, गजानन सोनुने, कादीर शेख, समीर पटेल, नागनाथ राख, संजय जाधव, निखील जाधव, साधना ताम्हाणे यांनी केली आहे.
COMMENTS