संपादक- सतिश शिंदे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील ...
संपादक- सतिश शिंदे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील नालंदा बुध्दविहार येथे साजरी करण्यात आली.
यावेळी बौध्द विकास मंडळाच्या वतीने नालंदा बुध्दविहार येथे सभा आयोजित केली होती, तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीला गावचे सरपंच मच्छिंद्र केदार, उपसरपंच उत्तमशेठ घुले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय आमले, पोलिस पाटिल कुलदिप कोकाटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून बुध्दपुजा पाठ घेण्यात आला.
यानंतर सभेला उद्देशून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांनी आपले मनोगत व अभिवादन केले.
सरपंच मच्छिंद्र केदार, उपसरपंच उत्तमशेठ घुले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय आमले, पोलिस पाटिल कुलदिप कोकाटे तसेच महेंद्र मरभळ व सागर कोकाटे, बाळासाहेब खरात या मान्यवरांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सरपंच मच्छिंद्र केदार, उपसरपंच उत्तमशेठ घुले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय आमले, पोलिस पाटिल कुलदिप कोकाटे, महेंद्र मरभळ, सागर कोकाटे, उत्तम तलांडे, आनंद आमले, विजय पोटे, संतोष आमले, कुंडलिक पोटे आदि ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन बौध्द विकास मंडळाचे अध्यक्ष बबन शिंदे, सेक्रेटरी बाळासाहेब खरात, सहसेक्रेटरी सतिश शिंदे, सदस्य विश्वास शिंदे, सुरेश खरात, संतोष शिंदे, वैभव खरात, प्रतिक खरात.
महिला सदस्या इंदुबाई खरात, मनिषा शिंदे, नंदाबाई शिंदे, कल्याणी शिंदे, पायल शिंदे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन बाळासाहेब खरात यांनी मानले.
COMMENTS