पुणे: शिक्रापूर (ता. Shirur) येथील पाबळ चौकात कंटेनरचे चाक युवकाच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा द...
पुणे: शिक्रापूर (ता. Shirur) येथील पाबळ चौकात कंटेनरचे चाक युवकाच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विकास राठोड व सखाराम चव्हाण हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच २८ बी जि २५८२ या दुचाकीहून पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर-पाबळ चौकातून चाकण चौकात येत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या जि जे १५ ए टी ७२०४ या कंटेनरची विकास राठोड या युवकाच्या दुचाकीला धडक बसली. कंटेनरचे चाक विकास अंकुश राठोड (वय २६ वर्षे रा. सोंडेवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सखाराम उखा चव्हाण (वय २७ वर्षे रा. सोंडेवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी जि जे १५ ए टी ७२०४ या कंटेनरवरील अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.
COMMENTS