जळगाव: जिल्ह्यातील एका गावामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन...
जळगाव: जिल्ह्यातील एका गावामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मामाच्या मुलीच्या लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम असताना अल्पवयीन भाचीला पळवून नेण्याची घटना घडली.
याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. विखरण शिवारात सदर मुलगी तिच्या आई-वडिलांसह २० एप्रिल रोजी सायंकाळी पोहोचली असता रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तिच्या वडिलांना झोपेतून जाग आली. यावेळी त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे आढळून आले म्हणून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तसेच हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असलेल्या नातेवाईकांकडे सुद्धा विचारपूस करण्यात आली. मात्र, ती आढळून आली नाही. म्हणून त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
दरम्यान, याबाबतचा पुढील तपास मिलिंद कुमावत, अखिल मुजावर, संदीप पाटील, संतोष चौधरी, विलास पाटील हे करीत आहेत.
COMMENTS