मथुरा (उत्तर प्रदेश): वधू वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर खोलीत बसली होती. यावेळी नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळब...
मथुरा (उत्तर प्रदेश): वधू वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर खोलीत बसली होती. यावेळी नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून एका युवकाने वधूवर गोळ्या झाडल्याची माहिती पुढे आली आहे.
गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मुबारकपूर गावातील रहिवासी खुबीराम यांची मुलगी काजलचा विवाह उत्साहात पार पडला होता. काजलने तिच्या वराला वरमाळा घातली. हसत-हसत वरमाळा घालण्याचा कार्यक्रम झाला. काजलच्या मैत्रिणींनी काजलला वरमाळाच्या जागेवरून एका खोलीत नेले होते. मुबारिकपूरमध्ये गुरुवारी रात्री नोएडाहून खुबीरामच्या ठिकाणी वरात आली होती. विवाहानंतर कोणी नाचत होते तर कोणी जेवत होते. गोळीबाराच्या आवाजाने धक्काच बसला.
काजलच्या डोळ्याजवळ गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वधूच्या मृत्यूने विवाह सोहळ्यात खळबळ उडाली. दरम्यान आरोपी पळून गेला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधीक्षक देहत श्रीचंद यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही घटना झालेली दिसत आहे. आरोपी तरुण हा गावातीलच रहिवासी असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
COMMENTS