रायपूर (छत्तीसगड): मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे. कांकेरच्या सरकारी हायस्कूलमध्...
रायपूर (छत्तीसगड): मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे. कांकेरच्या सरकारी हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या मुख्याध्यापकाने शाळेच्या स्टोअररूमला लैंगिक गैरवर्तन आणि वैयक्तिक आनंदासाठी गुप्त जागा बनवल्याचा आरोप आहे.
त्याला गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात आले आणि नंतर जिल्हा प्रशासनाने निलंबित केले.
प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले. कांकेरमधील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दोघे अनेकदा शाळेतल्याच एका बंद वर्गात गैरकृत्य करायचे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
दोघांचा गेल्या ९ वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. अनेकदा लोकांनी दोघांना शारीरिक संबंध ठेवताना रंगेहात पकडले होते. मात्र पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावेळी मात्र लोकांनीच व्हिडिओ बनवून व्हायरल केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण इंद्रप्रस्थ गावातील पीव्ही ३९ येथील शाळेतले आहे. राजेश पाल हा मुख्याध्यापक म्हणून या शाळेत काम करतो. त्याचे माध्यमिक शाळेतील विवाहित महिला कर्मचाऱ्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. अनेकदा हे दोघेही शाळेतच शीरिरीक संबंध ठेवायचे. सुट्टीच्या दिवशी दोघेही शाळेत भेटायचे. मग मुख्याध्यापकाच्या रूमला लागून असलेल्या स्टोअर रूममध्ये शारीरिक संबंध ठेवत होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
COMMENTS