अमरावती : अमरावतीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात योगश...
अमरावती : अमरावतीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात योगश घारड हे जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे.
योगेश घारड हे वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश घारड यांच्या पायाला गोळी लागली असून त्यात ते जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी योगेश घारड यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने वातावरण तापले आहे. त्यातच राणा दाम्पत्याला शनिवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अमरावतीत शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच अमरावतीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण, घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे परिस्थिती निवाळली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS