नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी आसाममधून अटक करण्यात आलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी...
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी आसाममधून अटक करण्यात आलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसामच्या कोक्राझार न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
एक दिवसापूर्वीच जिग्नेश मेवाणी यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली होती. तेथून त्याला आसामला नेण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेवानी यांना रस्त्याने अहमदाबादला नेण्यात आले, तेथून त्यांना रेल्वेने आसाममधील गुवाहाटी आणि नंतर रस्त्याने कोक्राझार येथे आणण्यात आले होते. मेवाणी हे वडगामचे काँग्रेस समर्थित अपक्ष आमदार आहेत. मेवाणी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी 'गोडसेला देव मानतात'. त्यांनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करावं."
वरील ट्विटच्या संदर्भात, मेवाणी विरुद्ध आयपीसी (IPC) कलम 120 B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) ट्विट आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत कोक्राझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS