सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इ...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ३ विद्यार्थ्यांची जेनेसीस इंटरनॅशनल कार्पोरेशन लि.मुंबई या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये ही निवड करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यास कार्यक्रमादरम्यान सुधारित तांत्रिक कौशल्यांसह व्यावहारिक ज्ञानही दिले जाते.तसेच दोन्ही सत्रातील सुट्टीच्या कालावधीमध्ये उद्योगातील इंटर्नशिप,कार्यशाळा,ऑनलाइन वेबिनार,उद्योगासाठी नवीनतम आवश्यक तंत्रज्ञानाचे प्रमाणित अभ्यासक्रम आणि उद्योगातील तज्ञ तसेच शैक्षणिक आणि प्रायोजित प्रकल्पांसह सेमिनार अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात येतो.
शाहरुख सय्यद या विद्यार्थ्याची सदर कंपनीमार्फत चेन्नई येथे ट्रेनी इंजिनियर म्हणून तर ओंकार थोरात आणि तन्मय नरवडे यांची दिल्ली येथे सर्व्हे इंजिनियर म्हणून निवड झाल्याचे प्रा.अमोल भोर यांनी सांगितले.
जेनेसीस इंटरनॅशनल कार्पोरेशन लि.मुंबई या कंपनीच्या माध्यमातून चेन्नई आणि दिल्ली मध्ये वाहतूक महामार्गाचे गुगल मॅप अपडेशन करण्याचे काम हे विद्यार्थी करत आहेत.या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाखाचे पॅकेज देणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS