पुणेः अपहरण करुन १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने नेपाळ बॉर्डर जवळील सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश येथे जा...
पुणेः अपहरण करुन १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने नेपाळ बॉर्डर जवळील सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील बिवरी गावातील गणेश कोंडीबा दगडे (वय ३८, रा. बिवरी, ता. हवेली, जि. पुणे) यांचा बिवरी येथे शेती व प्लॉटींगचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांचे प्लॉटींगमध्ये जागा खरेदी करुन अॅडव्हॉन्स रक्कम दिलेली होती, बाकी राहीलेली रक्कम देण्याच्या बहाण्याने आरोपींनी गणेश दगडे यांना २४/०३/२०२२ रोजी फोन करुन केसनंद (ता. हवेली, जि. पुणे) येथे बोलाऊन घेतले. गणेश दगडे यांचे बळजबरीने अपहरण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे उद्देशाने नेपाळ बॉर्डर जवळील सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) येथे डांबून ठेवले. त्यांना सुखरुप सोडणेकरीता त्यांचे कुटुंबियाकडे १० लाख रुपयांची मागणी करुन पैसे दिले नाहीतर जिवे ठार मारणेची धमकी दिली होती. त्यावरुन लोणीकंद पोस्टे येथे गु.र.नं. १२६/२०२२ भादवि ३४२, ३६४ (अ), ३८४, ३८६, ३४ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ध्यानात घेऊन लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी तात्काळ वरिष्ठांचे परवानगीने लोणीकंद तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक सुरज गोरे यांना आदेश देऊन पोना/अजित फरांदे, पोशि/सुधिर अहिवळे, पोशि/सागर शेडगे अशी टिम लागलीच उत्तर प्रदेश येथे रवाना केली.
पोउपनि सुरज गोरे व पोना/अजित फरांदे यांनी तांत्रीक तपासाचे आधारे अपहृत गणेश कोंडीबा दगडे यांचा नेपाळ बॉर्डर नजदीक जि. सिद्धार्थनगर, राज्य उत्तर प्रदेश येथे असलेबाबतचा सुगावा लागला. तात्काळ त्याठिकाणी जाऊन गणेश कोंडीबा दगडे यांना सुखरुप ताब्यात घेतले व दोन आरोपीतांना नेपाळ बॉर्डर नजदिक, जि. सिद्धार्थनगर, राज्य उत्तर प्रदेश येथे अटक केली. पुढील कायदेशीर कारवाई करीता लोणीकंद पोलिस स्टेशन येथे घेऊन येवून दाखल गुन्ह्यात आरोपीतांनी मागितलेल्या १० लाख खंडणी पैकी आरोपीतांनी ०१ लाख रुपये अकाऊंट वर स्विकारलेली रक्कम तात्काळ सिझ करण्यात आलेली आहे. पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात लोणीकंद तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक सुरज किरण गोरे करीत आहेत.
सदर कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलिस उपआयुक्त परीमंडळ-०४ रोहीदास पवार, सहा. पो. आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, लोणीकंद पोलिस स्टेशन वपोनि गजानन पवार, पोनि गुन्हे तटकरे, पोनि गुन्हे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सपोनि निखील पवार, पोलिस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, सफौ मोहन वाळके, पोहवा बाळासाहेब सकाटे, पोना कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, पो.अं. सुधीर अहिवळे,सागर शेडगे, पांडुरंग माने, अमोल ढोणे, बाळासाहेब तनपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे यांनी केली आहे.
COMMENTS