क्राईमनामा Live : बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका महिलेने तिच्याच प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार त...
क्राईमनामा Live : बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका महिलेने तिच्याच प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या प्रियकराने तिची फसवणूक करून तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले.
तसेच त्याने त्याचे लग्न झाले असल्याची माहिती लपवून ठेवली होती. हे प्रकरण झाढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
तीन वर्षांपूर्वी या महिलेची सोनो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरियारपूर गावात राहणारा काँग्रेस कुमार यादव याच्याशी भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. मात्र काँग्रेसने आपल्या लग्नाची बाब तिच्यापासून लपवून ठेवली आणि लग्नाच्या बहाण्याने महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले. जेव्हा या महिलेने त्याला लग्नासाठी विचारले तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिला टाळत असे. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झाले होते.
त्यानंतर महिलेला त्याच्यावर संशय आल्याने तिने काँग्रेस यादव बद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र काँग्रेसचे लग्न झाले असून तो चार मुलांचा बाप असल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्यासोबत फसवणुक झाल्याचे समजताच महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मला माझ्या मुलीचे लग्न अन्य ठिकाणी लावून द्यायचे आहे. मात्र काँग्रेस यादव आमच्या कुटुंबाला धमक्या देत असून तो माझ्या मुलीला घेऊन जाईल असे सांगत आहे. याप्रकरणी डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
COMMENTS