पुणेः परराज्यातुन पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्री करीता आलेल्यांना अंमली पदार्थ विरोधी पथक-१ (गुन्हे शाखा पुणे शहर) बेड्या ठोकल्या...
पुणेः परराज्यातुन पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्री करीता आलेल्यांना अंमली पदार्थ विरोधी पथक-१ (गुन्हे शाखा पुणे शहर) बेड्या ठोकल्या आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आली असून, पुढील तपास करत आहेत.
०७/०४/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ पथकातील स्टाफ बंडगार्डन पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथील आर पी एफ पार्सल चेक पॉईट गेट समोरील सार्वजनिक रोडवर एक वयस्कर व्यक्ती त्याचे उजवे हातात सॅक बॅग घेवून येत असलेला दिसला. त्याचेकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव सिमान शामसुंदर लिमा (वय ६० वर्षे, रा.मु.राजझुक्का गाव पोस्ट गुलबा, थाना ओडबा, जिल्हा गजपती राज्य ओडीसा) असे सांगितले. त्यानंतर त्याचे सँगबॅकची झडती घेता त्यामध्ये १,३१,४२०/- रुपये किंमतीचा ०६ किलो ६२१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याचेविरुध्द बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे ७७/२०२२,एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८(क),२०(ब)(ii)(ब)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाच जणांना अटक...
अंमली पदार्था ची तस्करी करणा-या ५ परराज्यातील जणांकडून ११,१९,५४०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा व अफीम हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे. ०७/०४/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अंमलदार यांना बातमी मिळाली की, "अनिलकुमार जानी हा त्याचे साईनगर, लेन.नं. ८,स्वप्निल फ्लोअर मिलचे मागील बिल्डींगमध्ये रो-हाऊस नं.३ चे तिस-या मजल्यावर रहाते घरी कोंढवा-बुद्रुक,पुणे या ठिकाणी त्याचे ०३ ते ०४ साथीदारासह राहत आहे. घरात अवैद्यरित्या अफिम व दोडा चुरा असे अंमली पदार्थ बाळगून ते सर्वजण त्याची विक्री करत आहेत." अशी मिळालेल्या बातमीचे आधारे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी तात्काळ कायदेशीर बाबींची पुर्तता करुन अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह बातमीच्या ठिकाणी छापा टाकुन करवाई केली.
सदर ठिकाणी १) अनिलकुमार हरीराम जानी (वय ३३ वर्षे,रा,साईनगर, लेन.नं. ८,रो-हाऊस नं.३ चे तिस-या मजल्यावर कोंढवा बुद्रुक पुणे. मुळ राहणार राजीवनगरपुर ता. सांचोर,जि.जालोर राज्य राजस्थान), २) सुनिलकुमार भागीरथराम बिष्णोई (वय २१ वर्षे, रा,सदर मुळ राहणार इसरोल, ता.चितलवणा जि.जालोर राज्य राजस्थान), ३) कमलेश सदराम बिष्णोई (वय २१ वर्षे,रा,सदर मुळ राहणार धोरीमणा जि.बाढमेयर राज्य राजस्थान), ४)सुरेशकुमार किसणाराम बिष्णोई (वय २२ वर्षे रा.सदर मुळ राहणार भुत्तेल,ता.चितलवणा,जि.जालोर,राज्य राजस्थान), ५)मनोहरलाल भगवानाराम बिष्णोई (वय ३० वर्षे रा.सदर मुळ राहणार पनोरीयावा ता.सेडवा जि.बाढमेयर राज्य राजस्थान) हे राहत असलेल्या घरातून ३९४ ग्रॅम ७७० मिली ग्रॅम अफीम कि.रु ७,८९,५४०/- रू किचा व २२ किलो अफुची बोंडे व दोडा चुरा ३,३०,०००/- रू किचा तसेच दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे २,०००/- रू किचे तसेच रु.५०,०००/- चे पाच मोबाईल हॅण्डसेट असा एकुण ११,७१,५४० /- किंमतीचा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं.३२३/२०२२,एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),१७(ब),२९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा पो आयुक्त,गुन्हे-१, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा.पोलिस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलिस अंमलदार, मारुती पारधी, संदिप जाधव, राहुल जोशी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
COMMENTS