धुळे : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना शुक्रवारी (ता. ८) रात्री केलेल्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रक...
धुळे : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना शुक्रवारी (ता. ८) रात्री केलेल्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच, २९ जणांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही काहीही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली.
नव्याने पोलिस दलात येणाऱ्या पोलिस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. शुक्रवारी रात्रीचे जेवणानंतर एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या २९ प्रशिक्षणार्थींना उलट्याचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
COMMENTS