सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : मंगळवार दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी मुक्ताई देवी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सन 2021/2...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : मंगळवार दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी मुक्ताई देवी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सन 2021/22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शरद नवले हे होते, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुलांनी स्वागतगीताने करून शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केल्यानंतर इयत्ता सातवी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगते सात वर्षातील शैक्षणिक आठवणींना उजाळा व कोविड कालावधी तसेच भविष्यामधे या शाळेविषयी असलेले प्रेम जिव्हाळा आपुलकी तसेच येथून मिळालेले संस्कार प्रेरणा याविषयी मत कु. पायल नवले, कु. तेजल नवले व . आयुष नवले ह्या विद्यार्थ्यांनी केले. शाळेला सर्व विद्यार्थ्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन गौरविण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या वतीने स्वांतत्र्य सैनिक श्री. सुभाष आढारी, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री. आत्माराम शिंदे व ग्रा. पं. सदस्या तथा शालेय शिक्षण समितीच्या सदस्या सौ. अर्चना शिंदे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शरद नवले यांच्यासह सर्व उपस्थित ग्रामस्थ व मान्यवर यांनी शाळेविषयी मागील तीन वर्षात शाळेमध्ये भौतिक सुविधासाठी २० लक्ष निधी शिक्षकांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याबद्दल व शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती व सुरु असलेली शैक्षणिक वाटचाल तसेच तालुक्यात विविध शैक्षणिकदृष्ट्या विविध कला- कीडा व सांस्कृतिक तसेच इतर विविध उपक्रमाबाबत समस्थ ग्रामस्थ उच्छिल व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शरद नवले उपाध्यक्ष श्री गणपत भालेराव आणि सदस्य सविता आढारी, कांचन नवले सविता नवले शिक्षणप्रेमी सदस्य श्री रामदास नवले ग्रा.पं . सदस्या सौ आर्चना शिंदे ,तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री आत्माराम शिंदे मा. स्वातंत्र्य सैनिक श्री सुभाष आढारी आदी उपस्थित मान्यवर यांनी सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. तसेच जुन्नर तालुक्यातून शिक्षणशास्त्र विषयात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढ कृती कार्यक्रम व परिणामकता याविषयावर प्रबंध सादर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे पी.एच.डी उच्च पदवीकरीता नव्याने निवड झालेले उच्छिल शाळेचे पदवीधर शिक्षक श्री सुभाष मोहरे यांचे समस्त ग्रामस्थ उच्छिल व शालेय व्यवस्थापन समिती उच्छिल आणि शिक्षकवृंद उच्छिल या सर्वांच्या वतीने गावचे पोलिस पाटील श्री सुनिल बगाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उच्छिल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री बापूशेठ नवले, श्री गुलाब आढारी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री हरिभाऊ शिंदे, श्री शांताराम शिंदे, तान्हाजी नवले, पांडुरंग भालेराव अतुल नवले देवेश नवले सुदामआपा नवले सुरेश नवले नितीन भालेराव चंदकांत शिंदे राणी नवले आदी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अन्वर सय्यद यांनी केले तर सर्वांचे स्वागत तसेच सत्कार व आयोजन सौ.स्मिता ढोबळे, सौ. आरती मोहरे व सौ. लिलावती नांगरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. सुभाष मोहरे यांनी व शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रामस्थांना आणि कमिटी यांस शाळेच्या इयत्ता सातवीच्या मुलांकडून छान अशी पावभाजीचे मेनू देण्यात आला होता. कार्यक्रमाचे आभार श्री शरद नवले यांनी मानले.
COMMENTS