विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, येथे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी समुपदेशन विभा...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, येथे दि. १२ एप्रिल २०२२ रोजी समुपदेशन विभाग अंतर्गत "कलमापन चाचणी तसेच करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्यातील इ.१०वीची परिक्षा दिलेले सुमारे २१४ विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रशासन आणि समुपदेशन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
या कलमापन चाचणीचे महत्त्व तसेच विविध क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर श्री अमोलजी चंगेडिया आणि त्यांचे सहकारी यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.तसेच प्रा.एस.के.मनसुख यांनी 'कला' या शाखेचे महत्व विदयार्थ्याना पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी.कुलकर्णी सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना कलमापन चाचणीचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सी.आर.मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती पी.एस.लोढा मॅडम, पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते, एम.सी.व्ही.सी.विभागप्रमुख प्रा.के.जी.नेटके तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक - प्राध्यापिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.व्ही.एच. सावंत, प्रास्ताविक समुपदेशन विभागाचे प्रमुख प्रा.वाय.डी.घोडके यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.जी.एम. रोकडे यांनी तर आभार प्रा.आर.एस. शिप्पुरकर यांनी केले. या कलमापन चाचणी व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या...
COMMENTS