आरोग्य टिप्स : रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे 'व्हिटॅमिन डीचे महत्वाचे काम आहे. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काह...
आरोग्य टिप्स : रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे 'व्हिटॅमिन डीचे महत्वाचे काम आहे. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काही पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळते. जाणून घ्या व्हिटॅमिन डीच्या अभावी होणारे रोग आणि शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत –
⏯व्हिटॅमिन डीच्या अभावी होणारे रोग
▪ व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस हा विकार होतो.
या विकारात डोक्याचा आकार मोठा होणे, बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट, पाय धनुष्यकृती आकारात वाकणे, लहान मूल वेळेत चालायला न लागणे, दात योग्य वेळेवर न येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
▪ मोठ्या लोकांमध्ये स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, थकवा, दंतक्षय, जखम उशिराने भरणे, केस गळणे आणि त्वचा रोग यांसारखे विकार आढळून येतात. व्हिटॅमिन डी अभावी मानसिक समस्या देखील निर्माण होतात. मूडमध्ये बदल होत राहतो. तणाव, उदासीनता, निराशा येते.
▪ व्हिटॅमिन डीच्या अभावी मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. तसेच तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते.
⏯शरीराला 'व्हिटॅमिन डी' मिळण्यासाठी खा 'हे' पदार्थ
▪सोयाबीन दूध
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीनचे दूध, सोयाबीन पनीर (टोफू) खाऊ शकतात.
▪संत्री
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.
▪गाजराचा रस
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.
▪दही
दह्यामध्ये प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळून येते.
▪दूध
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.
▪कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या
कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. मात्र याचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.
▪मशरुम
मशरुम्समध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
COMMENTS