आरोग्य टिप्स : अश्वगंधा (ashwagandha) एक प्राचीन आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आण...
आरोग्य टिप्स : अश्वगंधा (ashwagandha) एक प्राचीन आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात. अश्वगंधा आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक आहे.
जाणून घ्या अश्वगंधाचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे-
रोग प्रतिकारशक्ती वाढते
नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
१.डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी-
अश्वगंधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुण हे मोतीबिंदूपासून वाढण्यापासून रोखते.
२.निद्रानाशाची समस्या दूर होते-
अश्वगंधाचे सेवन केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते.
३.कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयोगी
अश्वगंधामध्ये जास्त प्रमाणात हायपोलिपिडेमिक आढळतं, त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण असल्याने रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर राहतात.
४.थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते-
नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केल्यास थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते.
५.शरीरावरची सूज कमी होते-
अश्वगंधामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते.
६.ताणतणाव कमी करते-
तणाव आणि चिंताग्रस्त विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या बहुतेक औषधी वनस्पतींमध्ये अश्वगंधाचा समावेश केला जातो.
७.केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी-
अश्वगंधाची पेस्ट अर्धा तास केसांना लावा त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा. या उपायाने केसानी वाढ होते. तसेच केसांतील कोंडाही कमी होतो. अश्वगंधा केसांमध्ये मेलेनिन नष्ट होण्यापासून रोखून केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखते. त्यामुळे केसांचा काळेपणा टिकून राहतो.
८.तारुण्य टिकवून ठेवते-
अश्वगंधामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी कमी करतात. त्यामुळे सुरकुत्या पडत नाही तसेच त्वचा सैल पडत नाही. त्यामुळे तुंम्ही तरुण दिसता.
COMMENTS