आरोग्य टिप्स : कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात कमकुवत होणे, हाता-पायांना मुंग्या येणे, स्नायू दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कॅ...
आरोग्य टिप्स : कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात कमकुवत होणे, हाता-पायांना मुंग्या येणे, स्नायू दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कॅल्शिअम वाढविण्यासाठी खालील पदार्थाचा आहारात अवश्य समावेश करा.
हिरव्या भाज्या
पालक, पुदिना आणि मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि जीवनसत्त्वांसह कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.
१.दूध-
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे. लहान मुलांना शरीराच्या उत्तम वाढीसाठी दररोज एक ग्लास दूध पिण्यास द्यावे.
२.पनीर-
पनीर हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
३.सोयाबीन-
सोयाबीनमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. सोयाबीनची भाजी बनवून खाऊ शकता तसेच सोया चंक्सही खाऊ शकता. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीनचे दूध, सोयाबीन पनीर (टोफू) खाऊ शकतात.
४.गूळ-
गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे असते. मात्र गुळाचे अधिक सेवन करणे टाळावे अन्यथा शरीरातील उष्णता वाढेल. शरीरातील कॅल्शियम वाढविण्यासाठी गूळ आणि भाजलेले शेंगदाणे खावेत. तसेच दुधात थोडा गूळ मिसळून प्यावा.
५.संत्री आणि आवळा-
संत्री आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.
६.तीळ-
तिळामध्ये कॅल्शियम सोबतच प्रथिने देखील असतात.
७.दही-
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका वाटी दह्यामध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते.
COMMENTS